Saturday, February 9, 2013

पहाटे सेक्स करा... राहा फिट

आपल्याला फीट राहण्यासाठी सकाळी सकाळी व्यायम करणं हे काही जणांच्या नियमात असतं, पण तुम्हांला माहितेय का? यापेक्षाही चागंलं वर्कआऊट काय आहे ते? पहाटे पहाटे आपल्या पार्टनरसोबत सेक्स केल्याने आपण अगदीच तंदुरस्त राहतो. एका संशोधनात ती बाब पुढे आली आहे. पहाटे सेक्स केल्यास आपल्याला एक विशेष अशी उर्मी निर्माण होते. आणि त्याने तुम्हांला फार फायदा होतो. १. मायग्रेनसारख्या आजाराची चिंता करण्याची गरज नाही. २. सेक्स केल्यास एकाच वेळेस तुमच्या ३०० कॅलरी बर्न करतात. ३. पहाटे सेक्स केल्यास तुमचं रक्ताभिसरण खूपच चागंलं होतं. आणि त्याने ब्लड प्रेशरही कमी होतं. ४. पहाटे सेक्स केल्याने तुम्हांला जास्त आनंद मिळतो. कारण की, तेव्हा तुम्ही जास्त उत्साही असता. ५. पहाटे सेक्स करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही सेक्स केल्यावरही जास्त थकत नाहीत. विवाहीत स्त्री-पुरुषांनो , आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचा मंत्र हवाय... मग सकाळच्या पारी लवकर उठून सेक्स करा... तुमची प्रकृती एकदम तंदुरुस्त तर राहिलच , शिवाय हार्ट अटॅकचा धोकाही संभवणार नाही... हे आमचे मत नाही , तर अमेरिकेतील संशोधकांनी काढलेला हा निष्कर्ष आहे. बेलफास्ट येथील क्वीन्स युनिवर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केलंय. आठवड्यातून किमान तीन दिवस सकाळच्या पारी सेक्स केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. रक्ताभिसरणाचा वेग वाढतो आणि ब्लड प्रेशरची समस्येवर मात करता येते , असा निष्कर्ष संशोधनाअंती काढण्यात आला आहे. न्यू सायंटिस्टच्या ताज्या अंकात याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. सकाळच्या वेळी केलेल्या सेक्स सेशनमुळे सांधेदुखी तसेच डोकेदुखीच्या रोगावरही मात करता येते. सकाळी सेक्स करताना तासाला ३०० कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो. या संशोधनाता आणखी एक बाब स्पष्ट झाली. सर्वेतील ३०० महिलांच्या पुरुष जोडीदारांनी सेक्स करताना कंडोमचा वापर केला नव्हता. अशा महिलांना डिप्रेशन कमी येते , असाही निष्कर्ष समोर आला. सकाळी सेक्समध्ये ऑस्ट्रोजन आणि इतर हार्मोन्स मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असल्याने केसांची चमक वाढण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत होते , असेही या अहवालात म्हटले आहे. परंतु ' अति तिथे माती , ' असा धोक्याचा इशाराही संशोधकांनी दिला आहे. आठवड्यातून तीनपेक्षा अधिक दिवस सकाळच्या वेळी सेक्स केल्यास त्याचा निगेटिव परिणामही होऊ शकतो. जास्त सेक्स केल्यास तुमची प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका संभवतो , असे या अहवालात खास बजावण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment